जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

We Care About Your Health

प्रस्तावना

  •  गडचिरोली जिल्हयाची निर्मीती २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपुर जिल्हयाचे विभाजन करुन झाली. या जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ १४,४१२ चौ. किमी. आहे असून लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १०,७२,९४२ एवढी आहे. हा जिल्हा ७६ टक्के घनदाट जंगलव्याप्त असून आदिवासीबहल, अतिदुर्गम व डोंगराळ, रेड कॉरीडार/नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो.
  • हया जिल्हयाच्या पूर्व दिशेस छत्तीसगढ राज्य, पश्चिमेस चंद्रपुर जिल्हा उत्तरेस भंडारा व गोंदिया जिल्हयाचा काही भाग दक्षिणेस आंध्रप्रदेश राज्याच्या सीमा लागून आहे.
  • प्रशासनाच्या दृष्टीने जिल्हयाचे एकूण ६ उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, व कुरखेडा) आहेत. एकूण १२ तालुके आहेत. जिल्हयात २ नगरपरिषद (गडचिरोली व वडसा) आहेत.
  • जिल्हयामध्ये १ लोकसभा क्षेत्र (चंद्रपुर जिल्हयाचा काही भाग मिळून) व ३ विधानसभा क्षेत्र आहेत

जिल्हयातील आरोग्य सेवा

गडचिरोली जिल्हयात २८५ खाटांचे १ जिल्हा सामान्य रुग्णालय असुन त्या अधिनस्त ३ उपजिल्हा रुग्णालये ९ ग्रामीण रुग्णालये कार्यान्वीत आहेत. तसेच ४७प्रा.आ. केंद्र, ३४ प्रा.आ. पथक व ३७६ उपकेंद्र कार्यान्वीत आहेत. जिल्हयाच्या सीमेलगतच्या राज्ये, जिल्हे तसेच गडचिरोली जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण उपचाराकरिता येत असल्यामुळे या रुग्णालयात २४ तास प्रसुती, थ्व स्त्रीयां संबंधी सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया तसेच नवजात शिशु व बालरोग संबंधी सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध झालेल्या आहे.

रुग्णालय स्थापना

शासन निर्णय क्र. नियोजन विभाग शासन निर्णय क्र. विविका-२००९/प्र.क्र. १०२/का-१४१५ मंत्रालय मुंबई दिनांक ०३/०२/२०१० अन्वये विदर्भ विवासः कार्यक्रम – २००९ अंतर्गत गडचिरोली येथे नविन महिला रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रास मान्यता मिळाली आहे

रुग्णालयाचे भुमीपुजन

या रुग्णालयाचे भुमीपुजन दिनांक ०५.१२.२०१० रोजी मा.ना.श्री आर. आर. पाटील, तात्कालीन गृहमंत्री, म.रा. तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा यांचे शुभहस्ते पार पडले.

उद्घाटन व लोकार्पण

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली या १०० खाटांच्या नवनिर्मात रुग्णालयाचे उ‌द्घाटन व लोकार्पण सोहळा दिनांक १५.०४.२०१८ रोजी पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, म.रा., यांचे शुभहस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. दिपक सावंत, आरोग्यमंत्री, म.रा., तसेच प्रमुख उपस्थिती मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम, पालकमंत्री, गडचिरोली यांची होती.

रुग्णालय इमारत बांधकाम

गडचिरोली येथिल नवनिर्मीत महिला रुग्णालयाच्या ईमारत बांधकामास सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ष २०११/प्र.क्र.४१९/ आरोग्य-३, मंत्रालय, मुंबई दिनांक १५/११/२०१९ अन्वये मंजूरी मिळाली. क मा. आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, मुंबई यांचे आदेश क्र.आयपीएचएस / स्त्री रुग्णालय/४७८००-८००/१३, अन्वये दिनांक-१२/०९/२०१३ गडचिरोली येथिल महिला रुग्णालयाच्या रुपये – १८७७.०९ लक्ष च्या ईमारत बांधकामास प्रशासकिय मान्यता प्राप्त झाली आहे. क इमारतीचे एकूण बांधकाम ८४७१.९८१ चौ.मी. असुन सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांचेकडुन दिनांक २६/०५/२०१६ रोजी महिला रुग्णालयाच्या ईमारतीचा ताबा प्राप्त झाला आहे.

कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकार

या आरोग्य संस्थेकरीता वैद्यकीय अधिक्षक वर्ग-१ (गट-अ) या पदास शासन निर्णय क्र संकिर्ण-२०१७/प्र.क्र. २३६ / आ-३ दि.२७ डिसेंबर २०१७ अन्वये कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी, म्हणून घोषित करण्यात आले.

बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत नोदणी या रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट कलम ५ अंतर्गत नोंदणी नगरपालीका, गडचिरोली येथे झाली असन नोंदणी क्रमांक २०/२०१७ दि २७.१२.२०१७ असा आहे.

अग्निसुरक्षा उपाय योजने अंतर्गत नोदणी या रुग्णालयाची अग्निसुरक्षा उपाय योजने अंतर्गत नोंदणी नगरपालीका, गडचिरोली येथे झाली असन प्रमाणपत्र क्रमांक नपग/अग्निवि/कावि/२९/२०१८ दि. १४.०४.२०१८ असा आहे. एकण १२९ फायर इस्टींगविशर रुग्णालयाच्या इमारतीत उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नोदणी या रुग्णालयाची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नोंदणी प्रादेशिक कार्यालय चंद्रपुर येथे झाली असून संपूर्ण हायजेनिक डिस्पोजल्स इंडीया प्रायवेट लिमीटेड मार्फत ग्राहक नोंदणी प्रमाणपत्र क्र.४००२९३ मिळाले आहे.

रुग्णालयातील उपलब्ध मोफत सुविधा

  • स्त्रियांच्या गर्भाशयाचे कर्करोगाची स्क्रिनींग करणे
  • साधारण प्रसुती, सिझेरीयन शस्त्रक्रीया व स्त्री अवयवा संबंधित इतर शस्त्रक्रीया
  • पिण्याचे शुद्ध व थंड पाणी तसेच आंघोळीसाठी गरम पाणी
  • कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा
  • मतिमंद बालकांचे समुपदेशन, शिकवण, उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रीया
  • आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
  • रुग्ण व नातेवाईकांना दोन वेळचे आहार
  • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत सर्व योजना
  • जननी सुरक्षा योजना
  • रक्त संक्रमण
  • कुपोषित बालकांना आहार व उपचार
  • शाम मातृ वंदना योजना
  • राष्ट्रीय बाल स्वाथ कार्यक्रम अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा
  • पीसीपीएनडीटी कायदेविषयक समुपदेशन नोदंणी क्र.एम.एच./जीडी/४०/२६/२०१७दिनांक ३०/१२/२०१७

बाह्यरुग्ण विभाग

  • करोना तपासणी केंद्र

  • हेल्थ कॉल सेंटर हेल्थ कॉल सेंटर आणि कॅज्युअल्टी रिस्ट्रीओ

  • औषध वितरण कक्ष

  • रुग्ण नोंदणी विभाग 

  • जन्म व मृत्यू नोदणी जन्म आणि मृत्यू नोंदणी

  • मजोफजयो MJPJAY

  • रक्त साठा केंद्र

  • सेंट्रल क्लिनीकल प्रयोग नाला सेंट्रल क्लिनिकल प्रयोगशाळा

  • महालॅब

  • क्ष-किरण विभाग

  • एकात्मीक सल्ला आणि तपासणी केंद्र ICTC lab & Sickel cell (Counselina)

  • एकात्मीक सल्ला आणि समुपदेशन केंद्र जैविक रोग, RII, SII, ICTC समुपदेशन कक्ष

  • गरोदर माता तपासणी ANC Clinic

  • सोनोग्राफी

  • प्रसुती पश्चात / असंसर्गीक रोग तपासणी PNC & NCD Clinic

  • लसीकरण व कुटुंबकल्याण Immunization & Family Planning

  • हिरकणी कक्ष Hirkani kaksh

  • पीएम मातृ वंदना योजना PMMVY

  • मध्यवर्ती प्रा वाय साठा केंद्र मध्यवर्ती ऑक्सिजन कक्ष

  • बालरोग ओपीडी

  • ईसीजी काय ईसीजी रूम

  • बाह्यरुग्ण परिसेविका नक्ष प्रभारी बहिण

  • रक्त पेढी बाधंकाम 

  • सांडपाणी प्रक्रीया यंत्र STP

  • पिण्याचे पाणि शुध्दीकरण

  • पावसाच्या पाण्याची साठवण

  • जैव वैद्यकिय कचरा विलगीकरण कक्ष 

  • रुग्णवाहिका शेड 

  • नातेवाईकास निवारा 

  • नातेवाईकास स्नानगृह

आंतरुग्ण विभाग

  • गरोदर व प्रसूति नंतर माता ANC आणि PNC प्रभाग

  • नवजात शिश आगमन करत आहे लेबर रूम

  • शस्त्रक्रीया गृह 

  • प्रसूतीशास्त्र अतिदक्षता करत आहे प्रसूती ICU

  • विषयज्ञ/वै.अ डयूटी करत आहे DR.room

  • नवजात शिशु अतिदक्षता कथा SNCU

  • मुख्य औषध साठा केंद्र 

  • सहाय्यक अधिसेविका करत 

  • स्वंयपाक घर स्वयंपाकघर खोली

  • पोषण पुर्नवर्सन केंद्र NRC

  • जिल्हा शिघ्र इस्तक्षेप केंद्र DEIC

  • बालरोग कक्ष 8 बालरोग विभाग

  • प्रसूति व शस्त्रक्रिया पश्चात करत PNC प्रभाग क्र.9,10

  • आशा कार्यकर्ती निवास आशा वर्कर स्टाईंग रूम

  • नातेवाईकास निवारा 

  • पाणी शूधिकरण यंत्र 

  • सौर ऊर्जापाणी गरम करण्यचे यंत्र 

  • वॉटर हीटर

  • कपडे धुण्याचे कक्ष

लेबर रूम

ठिकाण: लेबर वॉर्ड पहिल्या मजल्यावर एएनसी वॉर्ड क्र. १ जवळ आहे. प्रवेशयोग्यता: प्रसूती कक्ष निर्दिष्ट एएनसी वॉर्ड क्र. १ मधून प्रवेशयोग्य आहे.प्रसूती कक्षात जन्मावेळी होणाऱ्या नवजात अर्भकाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थापनासाठी ‘नवजात कोपरा’ (New Born Corner) नेमून दिलेला आहे.

एस.एन.सी. यु.

कमी दिवसाचे, कमी वजनाचे, गंभिर,अतिगंभीर जन्म जात व्यंगत्व असलेल्या नवजात अर्भकांकरीता उपचार.

ऑपरेशन थिएटर

ठिकाण: ऑपरेशन थिएटर पहिल्या मजल्यावर एलआर आणि एएनसी वॉर्डच्या समोर आहे.

प्रवेशयोग्यता: येथे एलआर आणि एएनसी वॉर्डमधून सहज पोहोचता येते. जन्मावेळी नवजात अर्भकाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थापनासाठी ओटीने ‘न्यू बॉर्न कॉरियर’ नियुक्त केले आहे